पिरंगुट -पाच महिन्यांपासून मोक्का अंतर्गत गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस पौड पोलिसांनी त्याच्याच लग्नात त्याला अटक केली आहे. त्यामुळे लग्नाच्या बेडीऐवजी तो आरोपी अलगद पौड पोलिसांच्या बेडीत अडकला.
अक्षय रोहिदास पडळघरे (वय 23, रा. पडळघरवाडी, रिहे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या नवरदेव आरोपीचे नाव आहे. आरोपी अक्षय पडळघरे याच्यावर पौड पोलीस ठाण्यात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर मोक्क अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे; मात्र आरोपी जानेवारी माहिन्यापासून फरार होता.
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आरोपीने गावातच कोणताही गाजावाजा न करता लग्न करायचे ठरवले. सोमवारी (दि. 22) पडळघरवाडी येथे त्याचे लग्न असल्याची माहिती पोलीस हवालदार अब्दुल शेख यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी सापळा लावून आरोपीस अटक केली.