पुणे – दरवर्षी २० मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिवस (वर्ल्ड स्पॅरो डे) म्हणून साजरा केला जातो. कुठे तरी प्रत्येकाचे बालपण चिऊताईच्या आठवणींशी जोडले गेले आहे. अलीकडील वाढते शहरीकरण, प्रदूषण, रासायनिक खते व कीटकनाशकांचा बेसुमार वापर, मोबाईल टॉवर्स, घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता यामुळे चिऊताई दिसेना झाली आहे. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या घटत चालली असल्याचे दिसत आहे.
चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. यापार्श्वभूमीवर आणि जागतिक चिमणी दिवस (वर्ल्ड स्पॅरो डे, 20 मार्च – 2021 ) च्यानिमित्ताने रोटरी क्लब आॅफ पुणे लोकमान्यनगर, ड्रीम वर्क्स रिअल्टी”या संस्थेने“नाशिकच्या – नेचर फॉरेव्हर”या एन.जि.ओ सोबत ‘चिऊ वाचवा ’ उपक्रम सुरू केला असून आपल्या लाडक्या”चिऊ”ताईला घरात परत बोलवायचा निर्धार करूया, असे आवाहन नागरिकांना केलं आहे.
या प्रामाणिक प्रयत्नांद्वारे आपल्या घराच्या बाल्कनीत एक चिमणीचं घरटं ज्याची विशेषता कि फक्त चिमणीच आत जाऊ शकणार आणि एक बर्डफीडर ज्यात राळ भरून ठेवता येईल अशी योजना करणार आहोत, जेणेकरून लवकरच आपल्या मैत्रिणीला आपल्या परिवारात परतायला कारण मिळेल आणि सभोवताली तिचा सहवास परत लाभेल, अशी माहिती रोटरी क्लब आॅफचे (पुणे) महेश घोरपडे यांनी दिली आहे.
तसेच या सामाजिक उपक्रमाला पुण्यातल्या- महाराष्ट्र क्रेडाई, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाठिंबा आणि समर्थन दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच याअंतर्गत 20 मार्च 2021 ला संध्याकाळी एक ऑनलाइन लाईव्ह सेमिनार होणार असून सुप्रसिद्ध पक्षीप्रेमी आणि अभ्यासक किरण पुरंदरे संबोधित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
संस्थेने आवाहन केलं आहे की, ती दूर का गेली याची कारणं काहीही असलं तरी आता ते बाजूला सारून एकत्रपणे आपण हा निर्धार करायचाच कि तिला तिचं हक्काचं घर आधीसारखं प्रत्येक अंगणात मिळवून द्यायचं. आपल्या परिसरातल्या लहान मुला – मुलींना पुन्हा भविष्यात हा प्रश्नपडायला नको “चिऊ”कुठे आहे, ती कशी असते ?