सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे
विधवा महिलांना हळदी कुंकूचा मान
माळेगाव – विधवा महिलांना हळदी कुंकूचा मान देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एस. पी. सराफ प्रा. लीने आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी केले. दरम्यान स्वप्नाली कापरे यांनी मानाची पैठणी जिंकली.
माळेगाव (ता. बारामती) येथील एस. पी. सराफ प्रा. लीच्या वतीने विधवा महिलांसाठी हळदीकुंकू, विरपत्नी, विशेष सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान व होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माळेगाव व परिसरातील अनेक विधवा महिलांसाठी हळदी कुंकुवासह संक्रांतीचा वाण, विरपत्नी सन्मान, वृक्षारोपण राबविण्यासाठी पणदरे येथील सचिन कुंभार, एकाचवेळी तलाठी व वन खात्याच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सुधा संजय भोसले, ग्राहक संरक्षण परिषदेत निवड झाल्याबद्दल प्रमोद जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी योगेश भोसले, विश्वास भोसले, चंद्रकांत वाघमोडे, अंजु वाघमारे, आशा नवले, सोनाली भोसले यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी मनाली कोकरे यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेतला. यावेळी उखाणे, विविध खेळ पार पडले. यावेळी लहान मुलांना प्रेरणादायी कथांचे पुस्तक देण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन एस. पी. सराफ प्रा. लीचे संचालक शिवाजी क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर, ॲड. शाम क्षीरसागर, ज्ञानेश्वरी क्षीरसागर, प्रियांका पोतदार यांनी केले.
लकी ड्रॉचे मानकरी
दरम्यान राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सोने चांदी खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी विशेष लकी ड्रॉ विजेते निलेश निगडे, रोहिणी राखपसरे , अनिता बुरुंगले यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी स्वप्नाली कापरे यांनी मानाची पैठणी जिंकली.