मुंबई – बॉलीवूडमधील अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया ही सर्वात लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचेही बॉंडिंग अनेकांचे लक्ष वेधून घेते. ही जोडी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. असाच एक ‘हॅलोविन’ अंदाजामधील हटके फोटो जिनिलीयाने शेअर केला आहे.
जेनिलीयाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिनिलीया, रितेश आणि दोन्हीही मुलं त्या फोटोमध्ये दिसत आहेत. त्या फोटोमध्ये रितेशसह त्यांच्या मुलांच्या हाता-तोंडावर पांढऱ्या बँडेज पट्ट्या गुंडाळल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ‘हॅलोविन टाईम’ अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे. त्या कॅप्शनच्या खाली रियान आणि राहिलच्या शाळेला तिने टॅग केलं आहे. या फोटोनंतर ही प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दरवर्षी परदेशामध्ये हॅलोवीन पार्टी केली जाते. त्या पार्टीमध्ये हॅलोविन लूक म्हणजेच अनेक जण भुतासारखा लूक करतात. या पार्टीमध्ये भूत-प्रेतांची वेशभूषा केली जाते. भारतातही या पार्टीचे अनेक ठिकाणी आयोजन केले जाते. अनेक बॉलिवूड सेलिब्रटीही हा लूक करीत असतात. आता हॅलोवीन पार्टीमध्ये जिनिलीया आणि तिच्या कुटुंबीयांनी देखील हटके स्टाईल केली आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.