Ritesh Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलीया देशमुख ( Genelia Deshmukh) हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ हे विनोदी असतात. त्यांच्या व्हिडिओला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळतो. नुकतेच रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यातून जिनिलीया घरात नसताना रितेश मुलांचा सांभाळ करताना कशी कसरत करावी लागते. हे दाखवून दिले आहे.
जिनिलीयाने इनस्टाग्राम स्टोरीला शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख वेळापत्रक लिहिताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तिने “आई तीन दिवसांसाठी बाहेर जाणार आहे, आणि बाबांनी घर सांभाळायचं ठरवलं आहे, रितेश आय लव्ह यु” असं कॅप्शनही दिलं आहे. जिनिलीया तीन दिवसांसाठी बाहेर जाणार असून मुलांना सांभाळण्याची जबाबदारी रितेशने घेतली असल्याचे दिसून येत आहे. जिनिलियाच्या गैरहजरीत मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून रितेशनेच तीन दिवसांच वेळापत्रक बनवले आहे. जिनिलियाच्या गैरहजेरीत रितेशकडे मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारीअसणार आहे.
दरम्यान, रितेश आणि जिनिलीयाच्या मुलांच्या दोन्ही मुलांच्या संस्काराचे अनेकदा कौतुक केले जाते. पालक म्हणून रितेश आणि जिनिलियाने आपल्या मुलांचा चांगले संस्कार दिले आहेत हे वेळोवेळी समोर आलं आहे. रितेश आणि जिनिलिया अनेकदा त्यांच्या मुलांबरोबर विविध ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात. फोटोग्राफर्सना बघून त्यांची मूलं नेहमी हात जोडून त्यांचे आभार मानताना दिसतात. यामागचे कारण देखील रितेश एका मुलाखतीत सांगितले होते.
रितेश-जिनिलिया यांच्या कामामुळेच त्यांचे फोटो काढले जातात आणि तुम्ही आमची मुलं म्हणून तुमचेही फोटो काढतात. पण या फोटोंसाठी तुम्ही काहीच केलेले नाही म्हणून कोणत्याही फोटोग्राफरला तुम्ही फोटो काढताना हात जोडून थँक्यू म्हणणे गरजेचे आहे. यामुळेच रितेश-जिनिलियाचे देखील नेहमी कौतुक होत असते.