उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे दररोज चर्चेत असते. ईदच्या निमित्तानेही सर्वजण उर्फीच्या लूकची आतुरतेने वाट पाहत होते आणि ईदच्या दिवशीही उर्फीने आपला बोल्डनेस कमी केला नाही. ईदला तयार होण्यासाठी उर्फीने साडी नेसली असली तरी तिच्या ब्लाउजच्या डिझाईनने सर्वांना धक्का बसला आहे.
उर्फी जावेदचा बोल्ड लूक
बिना लेस आणि ओव्हर-रिव्हलिंग ब्लाउज घालून उर्फी एका ठिकाणी पोहोचताच सर्वजण तिच्याकडे बघतच राहिले. यावेळी उर्फीने तिच्या मैत्रिणीने हाताने छापलेली पिवळी प्रिंटेड साडी घातली होती. यासह, तिने निळा ब्लाउज घातला होता ज्यामध्ये अंतर्वस्त्रांपेक्षा कमी फॅब्रिक वापरले गेले होते. जबरदस्त मेक-अप आणि केस बांधून आलेल्या उर्फीने लूक तिच्या चांगलाच अंगाशी आला.
View this post on Instagram
अभिनेत्रीने लोकांना मिठाई वाटली
उर्फीने चाहत्यांसाठी ईदच्या दिवशी काही बंगाली मिठाई देखील आणली, जी तिने स्वतः सर्वांना वाटली. यासोबतच उर्फी तिच्या फॅशन सेन्सबद्दलही बोलताना दिसली. उर्फी म्हणते की ती काहीही आणि कुठेही परिधान करू शकते, ही तिची ओळख आहे जेणेकरून लोक तिला वेगळे ओळखू शकतील.
View this post on Instagram
उर्फी जावेद अवघ्या २५ वर्षांची आहे
चाहते उर्फीच्या प्रत्येक चित्राची आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि उर्फीने तिचा लेटेस्ट लुक चाहत्यांसोबत शेअर करताच, काही मिनिटांतच तो व्हायरल झाला. उर्फी जावेद फक्त 25 वर्षांची आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.पण त्यावेळेसच्या ईद निमित्त केलेल्या लूकवरून काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे.
View this post on Instagram
उर्फीची प्रत्येक पोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. यातील बहुतेक पोस्ट उर्फीच्या विचित्र फोटोशूटच्या चर्चेत राहतात. खरं तर, तिच्या कामापेक्षा उर्फी केवळ तिच्या अफलातून कपड्यांमुळेच चर्चेत असते. कधी ती ज्यूटच्या गोण्यांतून कपडे बनवते, कधी काचेने तर कधी फक्त फोटो लावून कपडे बनवते.यामुळेच अनेकदा तिला ट्रॉलर्सनाही तोंड द्यावे लागते.