ऑलिंपिकपटू मारूती आडकर यांचा गौरव

पुणे – ऑलिंपिक दिनाचे औचित्य साधून पुणे राष्ट्रीय तालीम संघातर्फे ज्येष्ठ ऑलिंपिक कुस्तीगिर मारूती आडकर यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या हस्ते दिवंगत ऑलिंपियन बबनराव डावरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला होता.

महाराष्ट्रचे मल्ल खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथे 1952 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील कुस्तीत कांस्यपदक मिळवून दिले होते. भारतास ऑलिंपिक स्पर्धेत मिळालेले ते पहिलेच वैयक्तिक पदक होते. त्यांचा आदर्श ठेवीत युवा खेळाडूंनी कुस्तीमध्ये पुन्हा भारतास ऑलिंपिक पदक मिळवून द्यावे असे आवाहन आडकर यांनी यावेळी केले.

छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या या समारंभास पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, विश्‍वस्त हिंदकेसरी योगेश दोडके, तात्यासाहेब भिंताडे, हिंदकेसरी अमोल बराटे, सरचिटणीस शिवाजीराव बुचडे, मधुकर फडतरे, हेमेंद्र किराड, विकास रानवडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.