Manish Rawat | चालण्याच्या शर्यतीत मनीषला विजेतेपद

रांची – ऑलिम्पियन मनीष रावत याने राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत प्रथमच समावेश केलेल्या 35 कि.मी. अंतराच्या शर्यतीत विजेतेपद मिळविले. येथील मोराबदी रोड येथे ही स्पर्धा आज पार पडली.त्याने तमिळनाडूच्या गणपती कृष्णन याच्यावर 9 मिनिटांची आघाडी घेत ही शर्यत जिंकली. पण, तो पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेची पात्रता सिद्ध करू शकला नाही.

मनीषने आपला 30 वा वाढदिवस साजरा करताना ही कामगिरी केली. सुरवातीच्या 15 कि.मी. अंतरात तो गणपतीच्या साथीतच धावत होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याने आपली आघाडी वाढवत अखेरच्या टप्प्यात मुसंडी मारताना वर्चस्वासह अंतिम रेषा गाठली.

त्याने 2 तास 35 मिनिटे अशी वेळ दिली. आजच्या शर्यतीत दिल्लीचा विकास आणि आणि केरळचा रिथु बिंदुजी हे अनुभवी धावपटूंना आव्हान देऊ शकले नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.