पुणे – बिस्मार्ट सीए आंतर फर्म क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत सीए टायटन्स संघाने सलग दुसरा विजय नोंदविला. तर एसआरपीए इलेव्हन, चॅम्प्स सुपर किंग्ज, पेशवा सुपर किंग्ज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
चॅम्प्स सुपर किंग्ज संघाने पीएचएम टायगर्स संघाचा 41 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चॅम्प्स सुपर किंग्ज संघाने 8 षटकात 5 बाद 96 धावा केल्या. यात अमित बलदोटाने 29 चेंडूत 68 धावांची खेळी केली. याच्या उत्तरात पीएचएम टायगर्स संघाला 8 षटकात 7 बाद 55 धावाच करता आल्या. यामध्ये रुदरांग याने 30 धावांची खेळी केली. चॅम्प्स सुपर किंग्जकडून विवेक बाज (4-8), अमित बलदोटा (1-9) यांनी सुरेख गोलंदाजी केली. सामनावीर अमित बलदोटा ठरला.
दुसऱ्या सामन्यात पार्थ पडियाच्या उपयुक्त 27 धावांच्या खेळीच्या जोरावर एसआरपीए इलेव्हन संघाने कीर्तने अँड पंडित संघाचा 28 धावांनी पराभव केला. सीए टायटन्स संघाने कीर्तने अँड पंडित संघाचा 17 धावांनी पराभव केला.
लोकेश नाहर (40 धावा व 2 बळी) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पेशवा सुपर किंग्ज संघाने सीए सुपर किंग्ज संघाचा 16 धावांनी पराभव करून पहिला विजय नोंदविला.