नवी दिल्ली : दुचाकी बनवणारी कंपनी ओला इलेक्ट्रिकने अधिकृतपणे एका श्वानाचे त्यांच्या टीममध्ये नवीन सदस्य म्हणून स्वागत केले आहे. श्वानाचे नाव ‘बिजली’ असून सध्या या बिजलीचे आयकार्ड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चला, जाणून घेऊया सविस्तर.
कंपनी ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ‘बिजली’चे आयडी कार्ड शेअर केले आहे, जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
* बिजलीचा हा आहे कर्मचारी कोड !
आयडी कार्डमध्ये कंपनीच्या नवीन सदस्य बिजलीचा कर्मचारी कोड 440 आहे. ज्यामध्ये “PAW +ve” रक्तगट असे लिहिले आहे. त्याचबरोबर पत्त्याच्या जागी ओला इलेक्ट्रिकच्या बेंगळुरू कार्यालयाचा पत्ता लिहिला आहे. कार्डमध्ये असेही म्हटले आहे की बिजली मेसेजिंग प्लॅटफॉर्म स्लॅकद्वारे संचाराला प्राधान्य देते. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांचा संदर्भ देत “बीएचे कार्यालय” म्हणून आपत्कालीन संपर्क सूचीबद्ध करते.
* ‘बिजली’ ला मिळतेय भरपूर प्रेम !
सीईओ भाविश अग्रवाल यांच्या पोस्टला यूजर्सचे प्रचंड प्रेम मिळत आहे. एका युजरने लिहिले की, Awesome Possum. त्याचवेळी दुसऱ्या युजरने त्याची तुलना बोल्ट या हॉलिवूड अॅनिमेशन फिल्मशी केली. त्याचप्रमाणे यूजर्सचेही प्रचंड प्रेम मिळत आहे. पोस्टवर आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज, हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.