भुवनेश्वर -ओडिशा राज्याने हॉकीपाठोपाठ आता फुटबॉललाही हातभार लावण्याचे निश्चित केले आहे. तसे पाहायला गेले तर हे राज्य भारतीय हॉकीचे माहेरघर मानले जाते. तेथेच आता तीन अत्याधुनिक फुटबॉल प्रशिक्षण केंद्रे उभारली गेली आहेत.
येथेच येत्या 9 जूनपासून चार देशांच्या इंटन कॉंटीनेंटल करंडक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत यजमान भारतासह लेबनान, मंगोलिया व व्हानुआतू या देशांचे संघ खेळणार आहेत.
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही तीन फुटबॉल प्रशिक्षण केंद्रे येथे कार्यान्वित झाली. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या उपस्थितीत ओडिशा फुटबॉल अकादमी, भुवनेश्वर फुटबॉल अकादमी व कॅपिटल अरेना फुटबॉल केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीही उपस्थित होता. येत्या काळात भारतीय फुटबॉल संघ आशिया स्तरावर अव्वलस्थानी यावा यासाठी खेळाडू या स्पर्धेसाठी सज्ज बनले आहेत. त्यांचे स्वप्न पुूर्ण होणार का, हा प्रश्न आहे.