पॅरिस – पॅरिस सेंट-जर्मेनच्या कायलियन एम्बाप्पेने सलग चौथ्या वर्षी “लीग 1 प्लेयर ऑफ द इयर’चा किताब पटकावला आहे. त्याला 2019, 2021 आणि 2022 मध्ये लीग 1 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. सलग चार मोसमात ट्रॉफी जिंकणारा तो पहिलाच फुटबॉलपटू ठरला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून एम्बाप्पे महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीसोबत पीएसजीसाठी खेळत आहे. विशेष म्हणजे आपला संघ सहकारी मेस्सीला मागे टाकत त्याने सलग दोन वर्षे हा पुरस्कार पटकावला आहे.
पॅरिस सेंट-जर्मेनच्या स्टार फॉरवर्डने लीगमध्ये 28 गोल आणि 5 असिस्ट केले आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे, लीगच्या इतिहासात मला नेहमी जिंकायचे होते. पण मला इतक्या लवकर जिंकण्याची अपेक्षा नव्हती, असे एम्बाप्पेने यावेळी बोलताना म्हटले आहे.
झ्लाटन इब्राहिमोविक (2016), एडिनसन कावानी (2017), नेमार ज्युनियर (2018) आणि कायलियन एमबाप्पे (2019) यांच्या पावलावर पाऊल ठेवत, पॅरिस सेंट-जर्मेनच्या खेळाडूने सलग सातव्या वर्षी वर्षातील सर्वोत्तम खेळाडूची ट्रॉफी जिंकली आहे. गेल्या मोसमात याच श्रेणीत नामांकित, नूनो मेंडेसला “1 यंग प्लेयर ऑफ द इयर’ म्हणून निवडण्यात आले.