पाथर्डी – पाथर्डी तहसिल कार्यालयाच्या आवारात अश्लील चाळे करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शुक्रवारी सायंकाळी तहसिल कार्यालयाच्या आवारात एका झाडाच्या आडून तरुण- तरुणी अश्लील चाळे करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
पाथर्डी शहारातील विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारी तरुणी आणि शहरातील एका महाविद्यालयात शिकणारे जोडपे भर दिवसा अश्लील चाळे करीत असल्याची महिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गद्शनाखाली पोलीस नाईक अभय लबडे, लक्ष्मण पोटे यांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला समज देऊन सोडून देण्यात आले.अश्लील चाळे करण्यासाठी सरकारी आवाराचा थेट उपयोग होत असल्याने पुन्हा एकदा शासकीय जागेतील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. प्रेमीयुगलांना पालकांचा धाक नसल्याने बिनधास्तपणे अश्लील प्रदर्शन सार्वजनिक ठिकाणी करताना दिसत आहे.