बॉलिवूडच्या झगमगीत दुनियेचं आकर्षण कुणाला नाही? इथे ज्याला प्रवेश मिळते, त्याचे भाग्य उजळून निघते. अर्थात यासाठी नशीब आणि प्रयत्नासोबत स्वतःचे अभिनयकौशल्य देखील असणे गरजेचे आहे. या मोहमयी दुनियेत टिकून राहणेदेखील खूप कठीण आहे.
सगळीकडे प्रचंड स्पर्धा, रोज नव्याने दाखल होणारे फ्रेश चेहरे, यामुळे एखाद-दुसरा चित्रपट करून ही इंडस्ट्री सोडणारेही बरेचजण आहेत. यामागे वेगवेगळी कारणे आहेत. सध्या अभिनयाचे क्षेत्र सोडून एका मौलनाबरोबर निकाह लावणारी अभिनेत्री सना खान चर्चेत आहे.
आज आपण अशाच काही अभिनेत्रींची माहिती घेणार आहोत, ज्यांनी बॉलिवूडच्या झगमगाटाला रामराम ठोकून अध्यात्माचा मार्ग अवलंबून शांत जीवनाचा पर्याय स्विकारला आहे. पाहुयात, कोण कोण आहेत या यादीत….
1. सना खान
‘बिग बॉस’ फेम सनाने अनेक हिट चित्रपट दिले. ‘धन धना धन गोल’, ‘जय हो’, ‘वजह तुम हो’ आणि टॉयलेट एक प्रेम कथा अशा यशस्वी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ‘झलक दिखला जा सीझन -7’, ‘खतरों के खिलाडी सीझन -6′, कॉमेडी नाइट्स बचाओ’ आणि ‘एंटरटेनमेंट नाईट’ सारख्या कार्यक्रमांनी तिने छोटा पडदाही गाजवला. पण एवढे करूनही गुजरातच्या सुरतमध्ये मौलाना अनसशी लग्न करून सना खानने बॉलिवूडच्या चमकदार जगाला निरोप दिला. इस्लाम धर्माचा प्रचार करणे हा तिचा हेतू असल्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
2. झायरा वसीम
‘दंगल’ या चित्रपटाने प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री झायरा वसीमने आपल्या अभिनयाने सर्वांवर वेगळी छाप सोडली आहे. पण झायराने अचानक फिल्म इंडस्ट्रीमधून संन्यास घेण्याची घोषणा केली, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.
झायरा हिने ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ आणि ‘द स्काई इज पिंक’ या सिनेमांतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, पण एका दिवशी तिने आपल्या सोशल मीडियावर धर्माच्या प्रचारात लक्ष केंद्रित करून चित्रपटांपासून दूर जाण्याची घोषणा केली आणि ज्याने सगळे चकित झाले.
3.सोफिया हयात
सोफिया हयातने छोट्या पडद्यापासून रुपेरी पडद्यापर्यंत सर्वत्र आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘बिग बॉस’मध्ये पार्टीसिपेंट राहिलेल्या सोफियाने अध्यात्माचा मार्ग पत्करून बॉलिवूडच्या झगमागटाला दूर केले.
सोफिया सध्या ननसारखे जीवन जगते आणि स्वत: चे नन म्हणून वर्णन करते. सोफिया वेळोवेळी सोशल मीडियावर नन्ससारखे कपडे असलेले वादग्रस्त फोटोही शेअर करत असते.
4. ममता कुलकर्णी
90 च्या दशकाची प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी चित्रपटांपेक्षाही टॉपलेस फोटोशूटमुळे जास्त चर्चेत आली. यानंतर, ती अनेक दिग्दर्शकांची पहिली पसंती बनली. येथूनच ममताच्या जीवनात स्टारडम सुरू झाले. पण ममता जास्त काळ चित्रपटात राहिली नाहीत.
आधी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्यासोबत, तर नंतर ड्रग स्मगलर विक्की गोस्वामीबरोबर ममताचे नाव जोडले गेले. नंतर विक्कीसोबत लग्न केल्याची बातमी आली. पण विक्की तस्करीच्या प्रकरणात कारागृहात गेला. नंतर ममता कुलकर्णी अध्यात्माकडे वळली. ममताने ‘ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिन’ नावाचे पुस्तक देखील लिहिले आहे.
5.अनु अग्रवाल
‘आशिकी’च्या यशामुळे नावारूपास आलेली अभिनेत्री अनु अग्रवाल हीने एका अपघातानंतर तिच्या आयुष्यात मोठे बदल केले. हा अपघात इतका भयंकर होता की तिला जवळपास एक महिना जाणीव झाली नाही, ती कोमामध्येच राहिली.
जेव्हा अनु अग्रवाल कोमातून परत आली तेव्हा तिचे जग बदलले होते. तिने अध्यात्माचा मार्ग धरला. सध्या अनु योग करते आणि अध्यात्मिक मार्गावर चालत आहे.
6. बरखा मदान
1994 मध्ये मिस इंडियाचे विजेतेपद मिळवल्यानंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या बरखा मदानने अचानक 2012 मध्ये बॉलिवूडला निरोप देण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर ती बौद्ध धर्माची उपदेशक झाली. बरखा मदान बौद्ध धर्मामुळे फारच प्रभावित झाली आणि म्हणूनच ती बौद्ध धर्माची उपासिका म्हणून सध्या जीवन व्यतीत करत आहे.