अपहृत बाळ पुन्हा आईच्या कुशीत

झोपत असताना अपहरन : पकडले जाण्याच्या भीतीने अपहरण केलेल्या ठिकाणी परत सोडले

 

पुणे – साखर झोपेत असलेल्या बाळाला पळवून नेल्याने मुलाच्या विरहात असलेल्या आईला दोन दिवसांतच सुखद धक्‍का बसला आहे.

ज्या ठिकाणावरून बाळाचे अपहरण केले होते अपहरणकर्त्यांनी तिथेच बाळाला आणून सोडले. त्यामुळे एक वर्षांचे हे बाळ पुन्हा आईच्या कुशीत विसावले आहे.

कार्तिक नीलेश काळे (वय एक वर्ष) असे बाळाचे नाव आहे. हडपसर येथील पुलाखाली आईच्या कुशीत झोपलेल्या या बाळाचे सोमवारी (दि. 23) दोन महिलांनी अपहरण केले होते.

बाळाची आई सकाळी उठल्यानंतर तिला हा प्रकार समजला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत महिलेने त्वरित पोलिसांत तक्रार दिली. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.