ICC ODI World Cup 2023 New Zealand vs Pakistan 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या 35 व्या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव केला आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 401 धावा केल्या. पावसामुळे पाकिस्तानचा डाव 41 षटकांत कमी करण्यात आला आणि नवे लक्ष्य 342 धावांचे होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 25.3 षटकांत एक विकेट गमावून 200 धावा केल्या. यानंतर खेळ होऊ शकला नाही आणि पाकिस्तान संघ 21 धावांनी विजयी झाला.
पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला
पाकिस्तानने डकवर्थ-लीस नियमानुसार न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची आशा कायम आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा मार्ग कठीण झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 401 धावा केल्या. रचिन रवींद्रने 108 धावांची खेळी केली. तर कर्णधार विल्यमसनने 95 धावांचे योगदान दिले. फिलिप्सने 41 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियरने तीन बळी घेतले. हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पाकिस्तानकडून फखर जमानने 81 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने 63 चेंडूत 66 धावांची नाबाद खेळी केली. 25.3 षटकात पाकिस्तानची धावसंख्या 200/1 होती. यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही आणि पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार 21 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने एक विकेट घेतली.