चंदिगड– खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. (Khalistani terrorist Harwinder Rinda has died in Pak) पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती दिली. रिंडा याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र त्याला लाहोरमध्ये एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे समजते आहे.
रिंडा हा मे महिन्यात पंजाब पोलीस इंटिलिजन्स मुख्यालयावर झालेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये सहभागी होता, असेही पंजाब पोलिसांनी म्हटले आहे. रिंडा हा बब्बर खालसा इंटरनॅशनल या बंदी घातलेल्या खलिस्तानी संघटनेचा सदस्य होता. देशविरोधी कारवायांसाठी तो स्थानिक गुंडांची मदत घेत होता. त्याने पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला होता, अशी माहिती मिळाली होती.
मे महिन्यात मोहालीमधील पंजाब पोलिसांच्या इंटिलिजन्स मुख्यालयावर रॉकेट हल्ला करण्यात आला होता. याच महिन्यात हरियाणामध्ये एका वाहनातून शस्त्रे आणि स्फोटके देखील जप्त करण्यात आली होती. यासंदर्भात रिंडावर आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते.
नवानशहर येथे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयावर हातबॉम्ब फेकण्यातदेखील रिंडा सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. महाराष्ट्र, चेदिगड, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील आणखीन काही घातपाती कारवायांमध्येही सहभाग असल्याबद्दल रिंडा पॉन्टेड होता.