World Cup 2023 India vs New Zealand Match Live Score : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या आवृत्तीचा हा 21वा सामना आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला .
टाॅस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने डॅरिल मिशेलच्या शतकी आणि रचिन रवींद्रच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत सर्व गडी गमावून 273 धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 274 धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 130 धावा केल्या. रचिन रवींद्रने 75 आणि ग्लेन फिलिप्सने 23 धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (17 धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
Time to defend with the ball! @dazmitchell47 (130) and Rachin Ravindra (75) leading the way with the bat. Follow play LIVE in NZ with @skysportnz. LIVE scoring | https://t.co/YL5NT9eSnP #CWC23 pic.twitter.com/kuzLaFM1jy
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 22, 2023
नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला आलेल्या किवी संघाची सुरुवात विशेष झाली नाही. डेव्हॉन कॉनवे खातेही न उघडता सिराजचा बळी ठरला. विल यंगही 17 धावा करून शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. 19 धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडच्या डावाची धुरा सांभाळली. पॉवरप्ले संपल्यानंतर किवी संघाची धावसंख्या 34/2 होती. त्यानंतर न्यूझीलंड संघाने धावसंख्या 13 षटकांत 50 आणि 21 षटकांत 100 पार केली. रवींद्रने 56 चेंडूत तर मिशेलने 60 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी मिळून न्यूझीलंडची धावसंख्या 150 धावांच्या पुढे नेली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडची तिसरी विकेट 178 धावांवर पडली. रवींद्र 75 धावा करून शमीचा दुसरा बळी ठरला.
मिशेलने लॅथमसह न्यूझीलंडची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. मात्र, लॅथम पाच धावा करून कुलदीपच्या चेंडूवर बाद झाला, पण मिशेलने स्थिरता दाखवली. त्याने 100 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. कुलदीपने फिलिप्सला 23 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आठ धावा करून चॅपमनही बुमराहचा बळी ठरला. शमीने न्यूझीलंडच्या डावाच्या 48व्या षटकात सॅन्टनर आणि मॅट हेन्रीला बोल्ड केले. डावाच्या शेवटच्या षटकात त्याने मिशेलला 130 धावांवर बाद केले आणि सामन्यातील पाचवी विकेट घेतली. शेवटी, किवी संघाला 50 षटकात सर्व गडी गमावून 273 धावा करता आल्या. भारताकडून शमीच्या पाच बळींव्यतिरिक्त कुलदीपने दोन आणि बुमराह-सिराजने प्रत्येकी एक बळी घेतला.
दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला. कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.(India won the toss and elected to field)या सामन्यात हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर खेळत नसल्याचे रोहितने टॉसदरम्यान सांगितले. त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने एकही बदल केलेला नाही.
IND vs NZ Live: दोन्ही संघांचं प्लेइंग 11 :-
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
दरम्यान, विश्वचषक 2023 स्पर्धेपासून टीम इंडियाने आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सहा सामने खेळले आहेत. यापैकी पाच सामने किवी संघाने जिंकले. तर, 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. याच न्यूझीलंडने 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलं होते.