NZ vs IND – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दमदार खेळ करत न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला आहे. सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने सामान्यांच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ५१ चेंडूत १११ धावांची तुफानी शातकीय खेळी खेळली. त्यामुळे भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यजमान संघ १२६ धावांवरच सर्वबाद झाला. सामन्यातील जबरदस्त कामगिरीसाठी सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
उर्वशी रौतेला आणि रिषभ पंतच्या नात्याबाबत शुबमन गिलचा मोठा खुलासा म्हणाला,”त्याच्याकडून उर्वशीसाठी…”
न्यूझीलंडचा डाव
टीम इंडियाने ( NZ vs IND ) दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. सलामीचा फलंदाज फिन ऍलन २ चेंडूत शून्यावरच बाद झाला. यानंतर सलामीचा फलंदाज डेव्हेन कॉन्वे आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी डावाला सावरले, मात्र यादरम्यान दोघांनीही अत्यंत संथ गतीने फलंदाजी केली. त्यामुळे संघाच्या धावसंख्येवर परिणाम झाला आणि फलंदाजांवर दबाव निर्माण झाला. कॉन्वे २५ धावा आणि विल्यमसन ६१ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त यजमान संघाच्या कोणत्याही फलंदाजाला टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. भारताकडून गोलंदाजीत दीपक हुडाने सर्वाधिक ४ गडी बाद केले , तर युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी २ बळी मिळवले. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
#BCCI | निवड समितीच्या अध्यक्षपदाची माळ अजित आगरकर यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता
भारताचा डाव
नाणेफेक ( NZ vs IND ) गमावल्यानंतर टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरावे लागले. सलामीला ऋषभ पंत आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. पंतला पुन्हा अपयश आले आणि तो अवघ्या ६ धावांवरच बाद झाला. यानंतर ईशान किशनने सावध फलंदाजी करत ३१ चेंडूत ३६ धाव केल्या आणि बाद झाला. सूर्यकुमार यादवने संघाची धावसंख्या वाढती ठेवली, मात्र दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यर ( १३ धावा ), कर्णधार हार्दिक पंड्या ( १३ धावा ) आणि दीपक हुडा ( ० धावा ) आपल्याशी ठरले. सूर्यकुमारने एका बाजूने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. तो खेळात असताना त्याला सहकाऱ्यांच्या बाद होण्याचा कोणताही दबाव जाणवत नव्हता. सूर्यकुमारने ५१ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने १११ धावांची शतकीय खेळी खेळली. त्याच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. यजमानांकडून गोलंदाजीत टीम साऊदीने सर्वाधिक ३ तर लॉकी फर्ग्युसनने २ गडी बाद केले, तर ईश सोडीने १ गडी बाद केला.
A well deserved Player of the Match award for @surya_14kumar as #TeamIndia win by 65 runs in the 2nd T20I 👏👏
Scorecard – https://t.co/OvmynDiyd8 #NZvIND pic.twitter.com/TuYSRsIIgQ
— BCCI (@BCCI) November 20, 2022
टीम साऊदीची हॅट्रिक
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने ( NZ vs IND ) भारताच्या डावाच्या २०व्या षटकात हॅट्रिक घेतली. त्याने २०व्या षटकातील अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर हार्दिक पांड्या, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाद केले. टी-२० क्रिकेटमध्ये दोन हॅट्रिक घेणारा तो श्रीलंकेचा माजी खेळाडू लसिथ मलिंगा नंतर दुसरा गोलंदाज ठरला आहे. या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २२ नोव्हेंबरला नेपियर येथील मैदानावर खेळवला जाईल. मालिकेतील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे भारत सध्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.