बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसची खासदार नुसरत जहॉं सध्या खूपच चर्चेत आहे. विशेष म्हणजे, तिच्या प्रेगन्सीची सर्वत्र चर्चा रंगत आहे. तर आता तिच्या घरी लहान पाहुण्याचे लवकरच आगमन होणार आहे. काही महिन्यांपूर्वी नुसरत आई होणार असल्याचे समजले होते.
त्यानंतर तिचा पूर्व पती निखिल जैन आणि नुसरत यांचा वाद मीडियात आला होता. नुसरतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती लवकरच आई होणार आहे. नुसरत यश दासगुप्ता याच्याशी रिलेशनशिपमध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नुसरतने डॉक्टर्सना खास विनंती केली आहे की, डिलिव्हरीवेळी यश तिच्यासोबत असावा. त्यामुळे मुलाचा जन्म होताना यश नुसरतसोबत असण्याची शक्यता आहे. नुसरतचे लग्न 2019 मध्ये निखिल जैन याच्याशी झाले होते.
तुर्कीमध्ये दोघांनी धूमधडाक्यात लग्न केले होते. मात्र वर्षभरातच दोघांमध्ये विवाद सुरू झाले. विवादानंतर नुसरतने हे लग्नच अमान्य केले होते. दरम्यान नुसरतच्या प्रेगन्सीच्या बातम्या आल्या होत्या.
तेव्हा ती यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे समजले होते. त्यानंतर नुसरतवर टीकाही झाली होती. पण ट्रोलिंकडे तिने कधीही लक्ष दिले नाही, तर आता ती आई होणार आहे.