मुंबई – सोशल मीडियावर स्वत:ची नग्न छायाचित्रे (Nude photo shoot) पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा (Actor Ranveer Singh) जबाब नोंदवून घेतला. एका स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गेल्या महिन्यात चेंबूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याची नोटीस जारी केली होती.
सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अभिनेता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाला आणि त्याचे जबाब नोंदवण्यात आले, तो तेथून साडेनऊच्या सुमाराला बाहेर पडला. पोलिसांनी सांगितले की, आवश्यक असल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल. पोलिसांनी रणवीरच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 292 (अश्लील छायाचित्रे प्रकाशित करणे), 293 509 (अश्लील शब्द, हावभाव किंवा कृती) यांनुसार एफआयआर नोंदवला आहे. (Nude photo shoot: Actor Ranveer Singh’s statement recorded by Chembur police)