पुणे – अभिनेता रणवीर सिंह याने पेपर या मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याचे हे फोटोशूट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अनेकजण त्यावर टीका करत आहेत. याप्रकरणी त्याच्यावर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर आता पुण्यातही रणवीरवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पुणे शहर मनसेचे पदाधिकारी निलेश काळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस आयुक्तालयाला निवेदन दिले आहे.
अभिनेता रणवीर सिंहचे कृत्य समाजमान्य नाही. सोशल मीडियावर अशाप्रकारे फोटो अपलोड करून हिंदू संस्कृतीचा अपमान होत आहे. त्याचबरोबर स्त्रियांनाही हा फोटो बघायला लाज वाटते. लहान मुलांवर वाईट संस्कार होण्याची भीती आहे. रणवीर सिंहसारखे अशे कृत्य इतर अभिनेतेही करतील त्यामुळे अशा कृतीला चाप बसला पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी, काळे यांनी केली आहे.