वॉशिंग्टन – अमेरिकन प्रशासनावर भारतीय नागरीक ताबा घेत आहेत असे नर्म विनोदी उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काढले आहेत. अविश्वसनीय गुणवत्तेच्या आधारेच भारतीयांनी हे स्थान पटकावले आहे असे कौतुगोद्गारही त्यांनी काढले आहेत.
भाषण लिहून देण्यापासून नासा सारख्या अंतरीक्ष संस्थांच्या महत्वाच्या पदांवर सर्वत्र सध्या भारतीय नागरीकांचीच चलती आहे असे त्यांनी नमूद केले. स्वत: बायडेन यांनी आपल्या प्रशासनात अत्यंत महत्वाच्या पदांवर 55 अमेरिकन भारतीयांची निवड केली आहे.
बायडेन यांच्या कारकिर्दीला आज 50 दिवस पुर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर नासाच्या तंत्रज्ञांशी बोलताना ते म्हणाले की, आज बहुतांश भारतीय वंशाचे लोक अमेरिकन प्रशासनावर प्रभुत्व गाजवून आहेत.
नासाच्या प्रमुख स्वाती मोहन यांना उद्देशून ते म्हणाले की, स्वाती तुम्ही, माझ्या उपाध्यक्षा कमला हॅरीस, माझे भाषण लेखक रेड्डी, असे अनेक लोक आज भारतीय आहेत. तुम्ही लोक कर्तबगार आहात. नासाचे यान 18 फेब्रुवारी रोजी मंगळाच्या पृष्ठ भागावर उतरले. त्यानिमीत्त त्यांनी नासाच्या तंत्रज्ञानांचे कौतुक केले व त्यांच्याशी संवाद साधला.
नासाच्या या मंगळ अभियानाचे सर्वच प्रकारचे नेतृत्व स्वाती मोहन यांनी केले. त्यांचे कौतुक करताना अध्यक्षांनी भारतीयांचे कौतुक केले. बराक ओबामा, आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातही मोठ्या प्रमाणावर भारतीयांच्या नियुक्त्या उच्च पदांवर करण्यात आल्या होत्या.