जंगली हत्ती म्हटलं कि अंगावर शहारे येतात पण जर हाच हत्ती जर आपल्या कार वर येऊन बसला तर? पुढे काय होईल याची कल्पनाही आपण करूशकत नाहीत. असाच एक हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला असून, या व्हिडिओत एक जंगली हत्ती प्रवाशांच्या कार वर बसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
समोर आलेला हा विडिओ थायलॅंड देशातील ‘खाओ याई’ या राष्ट्रीय उद्यानामधील आहे. थायलॅंडच्या राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. या उद्यानातील 35 वर्षीय डुए नावाचा हत्ती रस्त्यावरून चालत असताना, शेजारून जाणाऱ्या गाडीवर बसण्याचा तो प्रयत्न करू लागला.
हत्ती पूर्णपणे गाडीवर बसण्याआधीच वाहनचालकानं प्रसंगावधान दाखवत गाडी जोरात पळवली. मात्र काही अंतर पुढे गेल्यानंतर गाडीची विंडशील्ड तुटल्यामुळं गाडी पुढे जाऊ शकली नाही. हा थरारक व्हिडीओ मागच्या गाडीतून प्रवास करणाऱ्यांनी आपल्या कॅमेरात कैद केला आहे.