लंडन : पंजाब नॅशनल बॅकेला दोन अब्ज डॉलर्सचा गंडा घालून फरार झालेला प्रख्यात हिरे व्यापारी निरव मोदी यांचा जामीन अर्ज इंग्लंडमधील न्यायलयाने बुधवारी फेटाळला. बॅंकेला गंडा घातल्यानंतर निरव मोदी देशातून पळून गेला होता. त्याला इंग्लंडमध्ये ताब्यात घेण्यात आले होते.
त्याने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर लंडन येथील उच्च न्यायलयात सुनावणी झाली. मोदीला सध्या लंडनच्या वंड्सवर्थ या सर्वाधिक कैदी असणाऱ्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याने कनिष्ठ न्यायलयात जामीनासाठी अर्ज केला होता. तेथे तो फेटाळल्यानंतर त्याने लंडन ऊच्च न्यायलयात अर्ज केला. मात्र तो देशाबहेर पळून जाण्याची भीती असल्याने सरकारी पक्षाने त्याला जामीन देण्यास विरोध केला.
आपल्या आशिलाच्या प्रकृतीला कारागृह मानवत नाही त्यामुळे त्याला त्याच्या लंडनच्या पश्चिमेकडील सेंटर पॉईंट अपार्टमेंटमध्ये त्याला नजरकैदेत ठेवण्यात यावे ही त्याच्या वकीलांची मागणी फेटळण्यात आली.
( याबाबतचे सविस्तर वृत्त लवकरच)