मुंबई – सध्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबद्दल तुफान चर्चा सुरु आहेत. विश्वचषकानंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली. दरम्यान, धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रसिद्ध समालोचक ‘हर्षा भोगले’ यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे.
“काही वर्षांपूर्वी धोनी जसा क्रिकेट खेळत होता तो धोनी आज आपल्याला दिसत नाही. खेळामध्ये तुम्हाला काही वर्षांनंतर शाररिक बंधन येतात. तुमचं शरीर पहिल्यासारखं काम करत नाही. प्रत्येकाला आक्रमक खेळ करण्याची इच्छा असते मात्र शरीर साथ देत नाही. आणि धोनीच्या बाबतीत सुद्धा हेच घडत आहे”. असं भोगले म्हणाले.