मुंबई – मुंबई पोलीस आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार आता एचडीएफसी बॅंकेतून होणार आहेत. यापूर्वी मुंबई पोलिसांना एक्सिस बॅंकेतून पगार मिळत होता, पण आता एचडीएफसी बॅंकेतून पगार मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एक्सिस बॅंकेचा एमओयू 31 जुलैला संपल्यानंतर नवीन बॅंकेचे प्रस्ताव आले होते. यामध्ये एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात अधिक सुविधा मिळत असल्याने या बॅंकेची निवड करण्यात आली आहे.
एचडीएफसी बॅंकेकडून मुंबई पोलिसांना उत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास 10 लाखाचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास 1 कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास 50 लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन 1 हजार रुपये मदत अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना एचडीएफसी बॅंक देणार आहे.