…आता अन्य जिल्ह्यांतील बाधितांना पुण्यात येण्याची गरज नाही

आरोग्य व्यवस्था उभारणी सुरू : पुण्यातील 30 टक्के रुग्ण जिल्ह्याबाहेरील

पुणे- शहरात करोनावरील उपचारांसाठी येणाऱ्या शेजारील जिल्ह्यांतील रुग्णांचे प्रमाण सुमारे 30 टक्के आहे. त्यावर आता प्रत्येक जिल्ह्यात सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे करोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी पुण्यात येण्याची आवश्यता भासणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 

पुणे शहरात सध्या 6 हजार 500 ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी पुणे शहर आणि जिल्ह्यातील 4 हजार 400 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

तर 2 हजार 100 बेड्सवर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांतील रुग्ण उपचार घेत आहेत. सोलापूर व सांगलीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता.

 

त्यामुळे रुग्ण पुण्यात उपचारासाठी येत आहेत. मात्र, आता दोन्ही जिल्ह्यांसाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र टॅंकरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबरोबरच ऑक्सिजनयुक्त 500 बेड्स उपलब्ध होणार आहे, असे राव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.