Indian Soldiers : भारतीय लष्कराने आपल्या सैनिकांना चीनी भाषा मंदारिन शिकवण्याचा निर्णय घेतला. हे लक्षात घेऊन लष्कराने टेरिटोरियल आर्मीमध्ये मंदारिन भाषेतील तज्ज्ञांची भरती सुरू केली आहे. भारतीय सैनिकांनाही चिनी भाषा शिकता यावी आणि पूर्व लडाखमध्ये सीमेवर उभ्या असलेल्या सर्व सैनिकांना चीन ड्रैगनची माहिती असावी, हा त्याचा उद्देश आहे. याशिवाय आपल्या सैनिकांना चिनी सैनिकांची भाषा सहज समजली असता, त्यामुळे तेही त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देऊ शकणार असा या मागचा उद्देश आहे,
प्रादेशिक सैन्याची स्थापना 1949 मध्ये झाली होती. यंदा तो ७५ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यावर्षी 5 चिनी भाषा तज्ञांची देखील टेरिटोरियल आर्मीने भरती केली. त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया जानेवारीत सुरू झाली आणि काही महिन्यांपूर्वीच ती पूर्ण झाली. मँडरीन भाषेत तज्ञ असलेल्या उमेदवारांना लेखी आणि तोंडी परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांची निवड केली जाते. निवडलेल्या पाच लोकांचे सरासरी वय ३० वर्षे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर सुरक्षा तज्ञांची नियुक्ती अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, परंतु ती अंतिम टप्प्यात आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले,’आम्हाला या महिन्याच्या अखेरीस मंजुरी मिळण्याची आशा आहे. चाचणीच्या आधारावर, आम्ही प्रथमच पाच ते सहा सायबर तज्ञांना सामील करण्याचा विचार करत आहोत.” असेही ते म्हणाले.
लष्कर करत आहे स्वत:ला अपग्रेड
गलवानमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीनंतर भारतीय लष्कर स्वत:ला अपग्रेड करत आहे. गेल्या तीन वर्षांत पूर्व लडाखमध्ये चीनसोबत लष्करी चकमकही झाली आहे. यानंतर भारतीय लष्कराने LAC वर पाळत ठेवण्याची यंत्रणा आणखी मजबूत केली आहे.