पुणे : मिळकतकराशी संबधित पुणे महापालिकेच्या सेवा आता नागरिकांना 24 तास एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी, महापालिकेकडून 9 प्रकारच्या मिळकतराच्या संबधित सेवा व्हॉटसऍपवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चॅटबोट द्वारे या सुविधा मिळणार असून नागरिकांना या सेवांसाठी महापालिकेत माराव्या लागणाऱ्या चकरांपासून मुक्ती मिळणार आहे.
यातील केवळ कर भरण्याची सेवा महापालिकेकडून ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली होती. तर इतर सेवांसाठी मिळकतकर विभाग, क्षेत्रीय कार्यालय तसेच नागरिसुविधा केंद्रांमध्ये नागरिकांना प्रत्यक्ष जागे लागत होते. या सेवांमध्ये मिळकतकराच्या स्वमुल्यांकणापासून ते मिळकतकर थकबाकी नसल्याच्या एनओसी पर्यंतच्या काही महत्वपूर्वी सेवांचाही समावेश आहे . या सेवांसाठी महापालिकेकडून 8888251001 या क्रमांकावर एका क्लीकवर मिळणार आहे.
या सेवांचा लाभ मिळणार एका क्लीकवर…
– देय व देय रक्कम : मिळकतकराची भरलेली रक्कम व देय रक्कम
– कराची पावती : थकबाकी नसल्यास मिळकतकराची पावती काढणे
– एनओसी प्रमाणपत्र : थकबाकी नसल्यास एनओसी प्रमाणपत्र काढणे
– ऑनलाईन पेमेंट : थकबाकी असल्यास मिळकतकराचा ऑनलाईन भरणा
– कर बिल : मिळकतकर बील मिळविण्यासाठी लिंक
– वापरकर्ता नोंदणी : वापरकर्ता त्यांचा फोन क्रमांक आणि ई-मेल आयडी प्रॉपर्टी आयडीशी लिंक करू शकतो.
– फोन क्रमांकावर बिल भरणे : नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे नागरिक मिळकतकर आयडी मिळवू शकतात.
– कर मोजणी : अंदाजे मिळकतकर मोजणी