नवी दिल्ली – मेटा नियंत्रित व्हाट्सअॅप आणि इतर प्लॅटफॉर्मच्या कामकाजावर काल मध्यरात्री बराच परिणाम झाला होता. त्यानंतर ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि यासंदर्भात समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या. एक तासभरानंतर व्हाट्सअॅप वरील कामकाज पुन्हा सुरळीत झाले. (Impact on the functioning of WhatsApp)
जगातील अनेक देशांमध्ये व्हाट्सअॅपच्या कामकाजावर परिणाम झाल्याच्या तक्रारी व्हाट्सअॅप कंपनीकडे आल्या होत्या. काही देशातील कामकाजावर परिणाम झाला असल्याचे वाट्सअॅपने (WhatsApp) मान्य केले आणि आम्ही शक्य तितक्या लवकर व्यवस्था पुनर्रस्थापित करत आहोत असे सांगितले. व्यवस्था पुनस्थापित झाल्यानंतर याची माहिती व्हाट्सअॅपने समाज माध्यमातून जारी केली.