मुंबई – मनी लॉंड्रिंग (money laundering case) प्रकरणात महिन्यात अटक करण्यात आलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर उद्या, गुरुवारी विशेष पीएमएलए न्यायालयाच्या अध्यक्षतेखालील न्या. एमजी देशपांडे यांच्यासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
ईडीने संजय राऊत (Sena MP Sanjay Raut) यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लॉंड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. सध्या ते आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संजय राऊत यांना 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.