#AusOpen : ‘फेडरर’वर मात करत ‘जोकोविच’ची अंतिम फेरीत धडक

मेलबर्न : आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुस-या मानांकित नोव्हाक जोकोविचने तिस-या स्थानावर असलेल्या राॅजर फेडररला पराभूत करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोविचने फेडररला ७-६, ६-४, ६-३ असे नमवले. आता रविवारी जोकोविचचा सामना दुस-या उपांत्य फेरीतील विजेत्या खेळाडूशी होईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना डाॅमिनिक थिम आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे.

दरम्यान, जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत मिलोस राओनिकचा ६-४,६-३, ७-६(७-१) असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली होती. दुसरीकडे उपांत्यपूर्व फेरीत फेडररने अमेरिकेच्या सँडग्रेनला ६-३, २-६, २-६, ७-६(१०-८), ६-३ असे पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.