जामिया गोळीबार प्रकरणी कडक कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

नवी दिल्ली:  गुरुवारी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात गोळीबार झाल्याच्या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरवरुन ही माहिती दिली. शाह म्हणाले की या घटनेसंदर्भात ते दिल्ली पोलिस आयुक्तांशी बोलले आणि कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. केंद्र सरकार अशा कोणत्याही प्रकारची घटना सहन करणार नाही आणि दोषीलाही सोडले जाणार नाही, असेही शहा म्हणाले.

गुरुवारी दुपारी ‘रामभक्त गोपाळ वर्मा’ नावाच्या व्यक्तीने जामिया कॅम्पसमध्ये प्रवेश केला आणि हवेत गोळीबार केला. यामध्ये शादाब फरूक नावाचा विद्यार्थी जखमी झाला. त्याच्या हाताला गोळी आहे. गोळीबार करताना गोपाळ ‘हे घ्या आझादी’ असं म्हणत होता. शादाबवर सध्या दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू असून त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.