ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोवीचचे 18 वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद

अंतिम सामन्यात मेदवेदेववर सहज मात

मेलबर्न  – सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याने नववे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसचे विजेतेपद पटकावताना कारकिर्दीतील 18 वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदही साजरे केले.

रविवारी ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोवीचने रशियाच्या डॅनियल मेदवेदेववर 7-5, 6-2, 6-2 असा सलघ तीन सेटमध्ये विजय मिळवला व अपेक्षेप्रमाणे विजेतेपदही पटकावले.

या विजेतेपदसाच्या जोरावर तो जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम राहिला असून सलग 311 आठवडे पहिल्या क्रमांकावर राहण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. त्याने रॉजर फेडररला मागे टाकत ही कामगिरी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.