पीएचएम टायगर्स, रॉयल्स उपांत्यपूर्व फेरीत

बिस्मार्ट सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2021 स्पर्धा

पुणे – आयसीएआयच्या पश्‍चिम विभागीय पुणे शाखेच्या वतीने आयोजित आठव्या बिस्मार्ट सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2021 स्पर्धेत साखळी फेरीत पीएचएम टायगर्स, रॉयल्स, एसआरपीए इलेव्हन, चॅम्प्स सुपर किंग्ज, पेशवा सुपर किंग्ज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत साखळी फेरीत अभिषेक खांबटे याच्या 58 धावांच्या खेळीच्या जोरावर पीएचएम टायगर्सने स्पाय वॉरियर्सचा 54 धावांनी पराभव करून दुसरा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पीएचएम टायगर्सने 8 षटकात 2 बाद 119 धावाचे आव्हान उभे केले.प्रत्युत्तरात स्पाय वॉरियर्स संघ 8 षटकात 6 बाद 65 धावाच करू शकला.

दुसऱ्या सामन्यात कविता पोद्दारने (15 धावा व 1-8) केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर चॅम्प्स सुपर किंग्जने शार्पशूटर्सचा 9 धावांनी पराभव केला. अन्य लढतीत आनंद डायमाने केलेल्या नाबाद 45 धावांच्या जोरावर एसआरपीए इलेव्हनने बिस्मार्ट संघाचा 9 धावांनी पराभव केला. कुणाल झामवर (नाबाद 34 व 1-15) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रॉयल्सने सीए सुपर किंग्जचा 8 गडी राखून पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.