पुणे – “मान्सूनबाबत देण्यात आलेले ईशारे लक्षात घेता, विविध व्यावसायिक कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरू नये,’ असे आदेश पालिकेने यापूर्वीच बजावले आहेत. तरीही, वाहने स्वच्छ करण्यासाठी पिण्याचे पाणी वापरले जात आहे.अशा 25 वॉशिंग सेंटर्सवर
पालिका प्रशासनाने कारवाई केली आहे.
इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर थांबवण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध पावले उचलली आहेत. शिवाय, सर्व वॉशिंग सेंटरमध्ये नळाच्या पाण्याचा वापर तपासण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागच्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
पालिकेच्या या कारवाईमध्ये पिण्याचे पाणी वापरणे बंद करण्याच्या नोटीस बजावण्यात आली आहे. दुसऱ्यांदा असे पाणी वापरताना आढळल्यास 5 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तर, तिसऱ्यांदा, नळजोड कापला जाणार आहे. दरम्यान, शहराच्या विविध भागांमध्ये पालिका कर्मचारी वॉशिंग सेंटर्सची अचानक पाहणी करत आहेत.