कराड – कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांना सन 2022-23 मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटक वस्तींचा विकास योजनांमधून व जिल्हा परिषद सेस फडांतर्गत एकूण 1 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने सदरचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती कराड दक्षिण तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
यामध्ये कराड दक्षिणमधील नांदलापूर, ता. कराड रस्ता कॉक्रीटीकरण व बंदिस्त गटर 10 लाख, नांदगाव 7 लाख, कार्वे 10 लाख, किरपे 10 लाख, पोतले 5 लाख, कोळे 10 लाख, वारुंजी-जिजामातानगर रस्ता कॉक्रीटीकरण 10 लाख, कापिल सामाजिक सभागृह 7 लाख, सैदापूर बंदिस्त गटर व रस्ता कॉक्रीटीकरण 10 लाख निधी मंजूर झाला आहे. तर जिल्हा परिषद सेस फंडातून सन 2022-23 अंतर्गत ओंड, ता. कराड येथील वॉर्ड क्र. एकमध्ये सामाजिक सभागृह 10 लाख, कार्वे रस्ता कॉक्रीटीकरण व पाईप गटर 7 लाख, नांदलापूर रस्ता खडीकरण व डांबरीकरण 5 लाख, गोळेश्वर रस्ता खडीकरण 7 लाख, असा एकूण 1 कोटी 10 लाखांचा निधी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने मंजूर झाला आहे. ग्रामस्थांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले आहेत.