Lok Sabha Election 2024 । पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:साठी नाही तर गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी मते मागत आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. यावरून आधी अमित शहांनी प्रत्युत्तर दिले तर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही उत्तर दिले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या दाव्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की,’पीएम मोदी 2024 मध्येच नव्हे तर 2029 मध्येही देशाचे पंतप्रधान होतील.’
Lok Sabha Election 2024 । नेमकं काय म्हणाले राजनाथ सिंह…
‘ज्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवली, ज्याने भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात मजबूत बनवली, अशा व्यक्तीला हटवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपचा एक वरिष्ठ नेता असल्याने मी स्पष्टपणे सांगू शकतो की ते 2029 मध्येही भारताचे पंतप्रधान होतील’ वृत्तसंस्थेशी बोलताना राजनाथ सिंह यांनी मोठा दावा केला.
Lok Sabha Election 2024 । मोदी सरकारचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले…
‘२०१४ मध्ये भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ११व्या क्रमांकावर होता, आता पाचव्या क्रमांकावर आहे. 2027 पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर असेल. जर आपल्याला महासत्ता व्हायचे असेल तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कोणालाही धमकावू नये. आपल्या ऋषीमुनींनी आणि मानवांनी वसुधैव कुटुंबकम् हे सर्व जगासाठी सांगितले आहे.’
तत्पूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला होता. अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी दावा केला होता की, जर भाजपने निवडणूक जिंकली तर अमित शहा यांना पंतप्रधान केले जाईल. अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, पंतप्रधान मोदी स्वत:साठी नाही तर अमित शहांसाठी मते मागत आहेत. ते पुढे म्हणाले होते. भाजप सत्तेत आल्यास योगी आदित्यनाथ यांना २-३ महिन्यांत मुख्यमंत्री पदावरून हटवले जाईल, असे ते म्हणाले होते. यावर आता भाजप नेते प्रतिउत्तर देतांना दिसत आहे.