सांगलीतील श्वास हॉस्पिटलला परवाना रद्द करण्याबाबत नोटीस !

कोव्हिड हॉस्पिटल सुरू करण्यास टाळाटाळ केल्याचा परिणाम, महापालिका आयुक्तांनी बजावली नोटीस

शिराळा : सांगली शहरातील कोव्हिड हॉस्पिटल ला परवानगी देऊनही हॉस्पिटल सुरू केले नसल्याने, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी गंभीर दखल घेत शहरातील श्वास हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. अनिल मडके यांना कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली आहे.

आपला परवाना रद्द का करू नये, तसेच आपल्या विरोधात गुन्हा दाखल का करू नये, असे नोटिशीत नमूद केले आहे. सांगली मनपा क्षेत्रात covid-19 रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालय अधिग्रहित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कल्लोळी, मेहता, या रुग्णालयांना सेंटर म्हणून परवानगी देण्यात आली होती.

यापैकी गणेश नगर मधील डॉ. अनिल मडके यांनी आपले श्वास हे कोविड हॉस्पिटल सुरू केले नव्हते, त्यामुळे श्‍वास हॉस्पिटलचे डॉ. अनिल मडके यांना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशान्वये नोटीस बजावण्यात आली आहे.

साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार सदरची नोटीस बजावण्यात आली आहे. आपला परवाना रद्द का करू नये, तसेच आपल्यावर गुन्हा दाखल का करू नये असे नोटिस मध्ये म्हटले आहे. यामुळे सांगलीतील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.