सांगली – काल पुण्यात मित्रानेच एका 16 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना ताजी असताना आज सांगलीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस कर्मचाऱ्याने एका महाविद्यालयीन युवकावर अनेसर्गिक संबंध प्रस्थापित करत या प्रकरणाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमती देत खंडणी घेतली आहे. हा भयंकर प्रकार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे घडला आहे.
हणमंत कृष्णा देवकर असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून या प्रकरणी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णत पिंगळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, हा महाविद्यालयीन तरुण आपल्या मैत्रीणीना भेटून रात्री उशीरा वसतीगृहात जात होता. त्यावेळी देवकर पेट्रोलिंग करत होते. तेव्हा त्यांनी या तरुणास विचारपुस केली असता त्याने मैत्रीणीला भेटून आलो असल्याचे सांगितले. 27 ऑक्टोबरला पहाटेच्या वेळी हा देवकर यांनी ही विचारपूस केली त्यानंतर तरुणाकडून मोबाईल नंबर घेतला.
दोन दिवसांनी म्हणजेच 29 ऑक्टोबरला देवकर यांनी त्या तरुणास फोन करुन भेटायला ये असे सांगितले. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संबंधीत तरुण पोलिसांना भेटला. यावेळी देवकर यांनी तुझे प्रेमप्रकरण तुझ्या आणि मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी तरुणास देत पैशाची मागणी केली. घाबलेल्या तरुणाने भितीपोटी देवकर यास 4 हजार रुपये दिले.
मात्र हे प्रकरण ईथेच थांबले नाही तर देवकर याने तरुणास मैत्रीणीचा मोबाईल नंबर दे तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग असे सांगितले. तरुणाने मात्र देवकरच्या या मागणीस नकार दिला. त्यामुळे देवकरला राग अनावर झाला त्यानंतर त्याने त्या मुलाला त्याच्याबरोबरच शाररिक सबंध ठेवण्याची सक्ती केली देवकरने त्या तरुणाला वसतीगृहातील रुमवर नेले. तिथे त्याच्यावर अनैसर्गिक संबंध ठेवले व या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला.
या प्रकारानंतर देवकरने पुन्हा तरुणास त्रास देण्यास सुरुवात केली. 21 नोव्हेंबरला तरुणास फोन करत पुन्हा शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. यावेळी तरुणाने नकार दिला तेव्हा देवकरने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. शेवटी तरुणाने पोलिस स्टेशन गाठले व देवकरच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून देवकर याच्यावर इस्लामपूर पोलिसांनी कारवाई केली. पुढिल तपास पोलिस करत आहेत.