मुंबई : प्रख्यात शेफ फ्लॉईड कार्डोझ यांचे बुधवारी निधन झाले. त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. द बॉम्बे कॅंटिन आणि ओ पेड्रो या मुंबईतील दोन लोकप्रिय हॉटेलचे ते मालक होते. त्यांनी अलीकडेच मुंबईत बॉम्बे स्वीट शॉप हा तिसरा व्यवसाय अलीकडेच सुरू केला होता.
कार्डोझ हे आठ मार्च पर्यंत मुंबईत होते. ते रहात असलेल्या न्यूयॉर्कमध्ये त्यांना ताप आल्याने आपण रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांनी समाजमाध्यमांवर स्पष्ट केल होते. हे हॉटेल्स चालवणाऱ्या दि हंगर आयएनसी या कंपनीने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही त्याची कल्पना मुंबई प्रशासनाला कळवली आहे. त्यांच्या भारत भेटीत त्यांना भेटलेल्या व्यक्तींशी आम्ही संपर्क साधत आहोत. त्यामूळे योग्य वेळेत ते योग्य ती वैद्यकीय मदत घेऊ शकतील, असे कंपनीने म्हटले आहे.