उस्मानाबाद : जिल्यात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण एका कार्यक्रमानिम्मित पानिपत येथे गेला होता. गुरुवारी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा रुग्ण उमरगा तालुक्यातील असून तो पत्नीसोबत एका कार्यक्रमाला पानिपत येते जाऊन आला होता.
तो २५ मार्चला परतल्यानंतर गावकर्यांनी त्याला तपासणी करण्यासाठी जाण्यास सांगितले होते; मात्र आपण या आगोदरच तपासणी करून आलो आहे असे त्याने ग्रामस्थांना सांगितले होते. दरम्यान ग्रामस्थांनी तपासणीचा त्याच्याकडे तगादा लावल्यानंतर अखेर त्याने उमरगा येथील जिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी केली.
त्यांचे नमुने पुण्याच्या संस्थेकडे पाठवण्यात आले होते. गुरुवारी त्याचा अहवाल रुग्णालयास प्राप्त झाला. त्यात त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, इतर सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच त्याच्या पत्नीला कोरोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध आरोग्यविभागामार्फत घेतला जात आहे.