मेडिकल, किराणा दुकानाच्या बाहेर रांगोळी काढून सोशल डिस्टन्सिंग

राहुरी,  (प्रतिनिधी)- सोशल डिस्टन्सवर अधिक भर देत राहुरीत व तालुक्‍यात किराणा, भाजीपाला, मेडिकल, व पेट्रोलपंपावरील इंधन खरेदी आजपासून बंधनकारक झाली आहे.

भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने बुधवारपासून भाजीपाला विक्रेत्यांना एका जागी बसून भाजीपाला विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. फेरीवाल्यांना घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करण्यास परवानगी आहे. तसेच वेगवेगळ्या विभागात भाजीपाला विक्री व्हावी, जेणे करून एकाच वेळी गर्दी होणार नाही. याची काळजी घेतली गेली. मॉल, किराणा दुकानात आज एकाचवेळी अनेक ग्राहकांना नेहमीप्रमाणे प्रवेश नव्हता. त्याचे कडून किराणा मालाची यादी घेवून त्यांना यादीप्रमाणे माल दिला गेला. ग्राहक दूकानाबाहेर विखरून उभे होते. काही किराणा दूकानात एकावेळेस एकाच ग्राहकास प्रवेश दिला गेला. रांगेतील दोन ग्राहकांमध्येही सुरक्षित अंतर होते. मेडिकल, किराणाच्या बाहेर वर्तूळाच्या रांगोळीत ग्राहक उभे होते.

राहुरी शहरात काल (मंगळवार) पर्यंत एका जागी बसून भाजीपाला विक्रीसाठी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत भाजीपाला विक्री होती परंतु, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी होत होती. त्यामुळे, कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका निर्माण झाला होता.गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला व फळे विक्रेत्यांचे विकेद्रीकरण केले गेले. एका जागी बसून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली. फक्‍त फेरीवाल्यांना घरोघरी जाऊन, गर्दी टाळून भाजीपाला विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

तहसीलदार शेख म्हणाले, शहरात एकही खासगी वाहन, दुचाकी व चारचाकी वाहनांना फिरण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. जीवनावश्‍यक गोष्टींसाठीच निर्धारीत वेळेत बाहेर पडावे. अन्यथा, कारवाईला सामोरे जावे लागेल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांनी घरगुती वापराच्या गॅस टाकीच्या नोंदणी व मागणीसाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊ नये.

गॅस सिलेंडर घरपोच
गॅस एजन्सीच्या संपर्काचे नंबर असे : एचपी गॅस एजन्सी (श्रीरामपूर)- 9226974681, हेमराज भारत गॅस एजन्सी – 7038300014, श्रीगणेश एचपी गॅस एजन्सी- 02426-233314, करपे एचपी गॅस एजन्सी (टाकळीमिया)- 9860003030, लक्ष्मी भारत गॅस एजन्सी – 9604111253, एचपी गॅस एजन्सी (वांबोरी) – 9975315891.

Leave A Reply

Your email address will not be published.