नागपुरात चक्‍क मेडिकलमध्ये दारुविक्री

नागपूर : करोना विरोधात लढा देताना लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांसाठी मेडिकल स्टोर्सची आवश्‍यकता सर्वात जास्त आहे. लोकांची हीच गरज लक्षात घेऊन शासनाने मेडिकल स्टोर्स सुरु ठेवण्याची परवानगी दिली. मात्र, काही लोकं याचा गैरफायदा घेत आहेत. नागपुरात एका मेडिकल स्टोर्समधून चक्क दारूची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.
मेयो रुग्णालयासमोर कांचन मेडिकल स्टोर्समध्ये नियमबाह्य पद्धतीने बियर आणि इतर मद्य विक्री सुरु असल्याची माहिती गणेशपेठ पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी घातलेल्या छाप्यात बिसलरी/मिनरल वॉटरच्या बॉक्‍सेसमध्ये छुप्या पद्धतीने बडवायजर, ट्युबर्ग, किंगफिशर या ब्रॅंडच्या बियरची विक्री सुरु असल्याचे उघड झाले. पोलिसांनी दुकानातून 90 बॉटल्स जप्त करत मेडिकल स्टोर्सचा संचालक निशांत गुप्ता याला अटक केली आहे.
या मेडिकल स्टोर्सच्या संचालकांचा एक नातेवाईक बियर बार चालवतो. त्याच्याकडून बियरच्या बॉटल्स आणून मिनरल वॉटरच्या बॉक्‍सेसमधून त्याची विक्री सुरु करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपी मेडिकल स्टोर्स संचालकाला अटक केली असून अशाच पद्धतीने इतर ही मेडिकल स्टोर्समधून मद्य विक्रीचा गोरखधंदा सुरु आहे का याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.