भीक नाही तर जनतेने जिव्हाळ्याने मदत केली- तावडे

मुंबई – कोल्हापूरमधल्या पुरग्रस्तांसाठी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोरिवतील रस्त्यावर फेरी काढून मदत मागीतली. त्यांचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आणि खासदार संभाजी राजे  यांनी त्यावर सडकून टीका केली होती. “स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारले आहे, असा मजकूर आपल्या फेसबुक अकाउंटवर लिहिला आहे.

दरम्यान, विनोद तावडे यांना ही टीका चांगलीच जिव्हारी लागली असून त्यांनी एक निवेदन काढून खासदार संभाजी राजेंना याचं उत्तर दिलं आहे. ‘कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील पूरग्रस्त बंधू-भगिनींना मदत करण्याची सामान्य जनतेची इच्छा होती. बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी. असं त्यांनी म्हंटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.