स्टॅवेंगर (नॉर्वे) – भारताचा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने येथे सुरू झालेल्या नॉर्वे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या क्लासिकल गटात शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या फेरीत चीनचा नवोदित खेळाडू वॅंग हू याचा पराभव केला. या विजयासह आनंदने या स्पर्धेत आपला सलग तिसरा विजय नोंदवला.
सामना बरोबरीत सुटला तर आर्मगेडन पद्धतीने निकाल काढला जातो. याच प्रकारात आनंदने क्लासिकल फेरीत केलेल्या या विजयी कामगिरीच्या जोरावर गुणतालिकेत 7.5 अशी अव्वलस्थानी झेप घेतली आहे.
त्याने या लढतीत वॅंगचा अवघ्या 44 चालींतच पराभव केला. आनंदने या स्पर्धेची थाटात सुरुवात करताना पहिल्या फेरीत फ्रान्सच्या वाशिर लॅग्रेव्हचा तर दुसऱ्या फेरीत वासीली टोपालोव्हचा पराभव केला होता.