नवी दिल्ली – प्रदीप मेहरा या युवकाचा एक धावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्याला सैन्यात भरती व्हायचे आहे. त्यामुळे दिवसभर मॅकडोनाल्डमध्ये काम करून रात्री घरी जाताना तो धावत जातो. तो अल्मोडा, उत्तराखंड येथील रहिवासी आहे. चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी त्याचा धावतानाचा व्हिडीओ बनवला आहे. त्यांनी त्याला लिफ्ट दिली मात्र त्याने लिफ्ट नाकारत आपण धावण्याचा सराव करत असल्याचे सांगितले. त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आता रि. लेफ्ट. जनरल सतीश दुआ यांनी प्रदीपसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, चित्रपट निर्माते विनोद कापरी रात्री नोएडामधून आपल्या कारमधून जात असताना त्यांना खाद्यावर बॅग घेऊन धावत जाणारा एक मुलगा दिसला. त्यांनी त्या मुलाला म्हणजेच प्रदीपला त्यांच्या कारमधून घरी सोडण्याची अनेक वेळा ऑफर दिली, परंतु त्याने नकार दिला. प्रदीपने सांगितले की, तो मॅकडोनाल्डमध्ये काम करत असून शिफ्ट संपल्यानंतर घरी जाताना तो धावत जातो. त्याला लष्करात भरती व्हायचे असून धावण्याचा सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे सवय होण्यासाठी शिफ्ट संपवून घरी जाताना धावत घरी जात असल्याचे त्याने सांगितले.
Although Mr @digvijaya_28 is making a well intentioned appeal, I'm afraid I don't agree. While his Josh seems to be par excellence, he would still have to qualify in recruitment tests on his own merit, even if he's assisted to train for it. Army has no provisions or reservations https://t.co/37xQHinVCL
— Lt Gen Satish Dua 🇮🇳 (@TheSatishDua) March 21, 2022
दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रि. लेफ्ट. जनरल सतीश दुआ यांनी प्रदीपसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी ट्वीट करत त्याची प्रशंसा केली आहे. तसेच त्याच्या योग्यतेच्या आधारावर भरती परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी मदत करण्यास कुमाऊं रेजिमेंटचे कर्नल, माजी लष्कर कमांडर जनरल राणा कलिता यांच्यासोबत चर्चा केली आहे. आपल्या रेजिमेंटमध्ये भरती करण्यासाठी त्याला प्रशिक्षित करण्यासाठी प्रत्येक शक्य ते प्रयत्न करु असं आश्वासन दिल्याचंही त्यांनी दिल्याचं सांगितले. प्रदीपचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या जिद्दीचे कौतुक होत आहे.