सणबूर – राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचा 56 वाढदिवस कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर ता. पाटण येथे सामाजीक विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून रात्री उशीरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक यांची मोठी गर्दी झाली होती. वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण सौ. स्मितादेवी देसाई, सौ. अस्मितादेवी देसाई यांनी केले.
यावेळी त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे त्यांनी आशिर्वाद घेतले. त्यावेळी त्यांचे बंधू रविराज देसाई, चिरंजीव यशराज देसाई, कन्या कु. ईश्वरी देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. शंभूराज देसाई यांचा मरळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने सत्कार व अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कै. सौ. वत्सलादेवी देसाई, स्व. शिवाजीराव देसाई समाधी व पुर्णाकृती पुतळा, लोकनेते बाळासाहेब देसाई पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 या गळीत हंगामामधील उत्पादित साखर पोत्यांचे पोती पूजन केले.
वाढदिवस नियोजन समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग पाटण अंतर्गत लहान मुलांचे शालेय साहित्याचे प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी 11 ते 4 पर्यंत ते शुभेच्छा स्विकारल्या. नामदार चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाना पारितोषिक देण्यात आले.
वाढदिनी ना. शंभूराज देसाई यांना मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, ना. अजितदादा पवार, अंबादास दानवे, ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दुरध्वनीद्वारे, तर ना. उदय सामंत, ना. संदिपान भुमरे, ना. दादा भुसे, ना. संजय राठोड, ना. अब्दुल सत्तार, ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री राम शिंदे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. प्रतापराव पाटील-चिखलीकर, खा. श्रीमंती छत्रपती उदयनराजे भोसले, माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. अनिल बाबर, आ. शहाजीबापू पाटील आदी. मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कराड व पाटण तालुक्यातील प्रशासकीय पदाधिकारी, नगरसेवक, विविध संघटनाचे पदाधिकारी, मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.