मुंबई – कन्नड अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कांतारा’ने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर असाक्षरशः राज्य केले. भारतासह जगभरात कांताराने जबरदस्त कमाई केली.हा चित्रपट 2022 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला. ‘कांतारा’ चित्रपटाने अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीला देशभरात रातोरात स्टार बनवले आणि चाहते त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ऋषभने नुकताच खुलासा केला आहे की ‘कांतारा 2’ 2024 साली प्रदर्शित होणार आहे. यासोबतच ऋषभने सांगितले की, ‘कांतारा 2’ हा सिक्वेल नसून प्रीक्वल असेल कारण या भागात चित्रपटाची कथा खूप वर्षांपूर्वीची असणार आहे असा सूतोवाच ऋषभ शेट्टीने केला आहे.16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘कांताराने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
ऋषभ शेट्टीशिवाय या चित्रपटात सप्तमी गौडा, मानसी सुधीर, किशोर, अच्युथ कुमार आणि प्रमोद शेट्टी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. ‘कांतारा’ सुरुवातीला कन्नडमध्ये प्रदर्शित झाला होता, परंतु जेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले तेव्हा तो हिंदी, तमिळ, मल्याळम आणि तेलगूमध्येही प्रदर्शित करण्यात आला होता.
कांताराला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही दाद दिली. समीक्षकांनी चित्रपटाचे कलाकार, दिग्दर्शन, लेखन, निर्मिती डिझाइन, सिनेमॅटोग्राफी अशा सर्वच डिपार्टमेंटचे कौतुक केले.त्यांमुळे कांताराच्या प्रीक्वलमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.